AI Job Loss
Esakal
पुणे- आपल्या घरातील लहान मुलांसकट आता सगळ्यांना हे वाक्य पाठ झालं असेल की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता नोकऱ्या जाणार..! पण हे वाक्य आलं कुठून.? याचा जनक कोण..? खूप वर्षे आधी जेव्हा कॉम्पुटर आले त्यावेळी देखील अशीच चर्चा सगळीकडे सुरू झाली होती. बॅकांतील कर्मचाऱ्यांनी तर कॉम्पुटरला विरोध करत संपही पुकारल्याच्या नोंदी आहेत. तरीही आजच्या युगात कॉम्पुटर हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक झाला आहे. तसंच आता एआयबाबत देखील होईल का..?
याविषयी गोल्डमन सॅक्स या अमेरिकन कंपनीने याचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे. गोल्डमन सॅक्स ही जगातील सर्वांत मोठी आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. याचे मुख्य कार्यालय अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात आहे. या कंपनीने याचा सविस्तर अभ्यास करत एआय आल्याने नोकऱ्या जातील का, बेरोजगारी वाढेल का, त्यामुळे श्रम उत्पादनावर काय परिणाम होईल, नव्याने नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी होईल का, कोणत्या क्षेत्रांवर अधिक परिणाम होईल या प्रश्नांची उत्तरे आकडेवारींचा दाखला देत प्रसिद्ध केली आहेत. काय आहे या अहवालात सविस्तर जाणून घेऊया सकाळ+ च्या लेखातून.