

AI Job Loss: China कोर्टाचा मोठा निर्णय! कंपन्यांना सरसकट layoffs करता येणार नाहीत
E sakal
AI vs Jobs: China Sets Rules, But Where Does India Stand?
एआयमुळे जाणाऱ्या नोकऱ्या हे जागतिक संकट आहे पण चीनने आता याविषयी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. चीनच्या हांगझोऊ न्यायालयाने कंपन्यांना सांगितलं आहे की, तुम्ही सरसकट ऑटोमेशन करून लोकांना नोकऱ्यांवरून कमी करू शकत नाही. भारतात काय परिस्थिती आहे बरं? एकीकडे परदेशी कंपन्यांना पायघड्या घालताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या हक्काची काय परिस्थिती आहे, सविस्तर वाचा सकाळ प्लसमधील या लेखात
चीनमधील हांगझोऊ येथील न्यायालयाच्या निर्णयामुळे एआय आणि नोकऱ्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अनेकदा कंपन्या ऑटोमेशनचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करतात. ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांनी मागच्या काही महिन्यांत केलेल्या नोकरकपातीमागे एआय हेच कारण होतं, असं म्हटलं जातंय.
जगभरातील व्यवसायांत अत्यंत वेगाने एआय मॉडेल्सचा वापर करून मानवी कामांची जागा घेत असताना किंवा त्यांचे स्वरूप बदलत असताना, हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. चीनच्या न्यायालयाने केवळ एआय नव्हे तर कायदा, न्याय्यता, तांत्रिक संक्रमणाच्या काळातील जबाबदारी अशा विविध गोष्टींवर भर दिलाय.