

AI Job Displacement Solution
esakal
‘एआय’ तंत्रज्ञानामुळे कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या ५ ते १५ वर्षांनंतर जाणार असतील, तरी त्या गेल्यावर त्यांनी काय करायचं आणि ही बेकारी थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे याचं एक सोपं उत्तर म्हणजे लोकांना कामावरून काढण्याऐवजी प्रत्येकाचे कामाचे तास कमी करावेत. त्यामुळे लोक बेकार होणार नाहीत आणि त्यांना मित्र आणि कुटुंब यांच्याबरोबर जास्त वेळ घालवणं, खेळ, करमणूक, संगीत, वाचन किंवा इतर छंद या गोष्टी जोपासणं हे शक्य होईल. एकूणच सामाजिक आणि मानसिक स्थैर्य आणि शांती अधिक निर्माण होईल.