

Is AI good for parenting
e sakal
parents using AI for kids homework, children mental health
मुलांच्या गृहपाठासाठी, प्रोजेक्टसाठी तुम्ही एआयचा वापर करता का, कधीकधी एआयला मुलांच्या वाढीविषयी प्रश्नही विचारता का, एआयने दिलेली उत्तरं तुम्हाला पटतात का या सगळ्याची उत्तरं जर हो असतील तर तुम्ही हा लेख जरुर वाचायला हवा.
मध्यंतरी चॅटजीपीटीचे सीईओ सॅम अल्टमन म्हणाले, आता चॅटजीपीटीशिवाय मुलं वाढवण्याची कल्पनाच मी करू शकत नाही. सॅमच्या या विधानाने जागतिक स्तरावर चांगलीच खळबळ माजवली. पालकत्त्वासाठी लोक जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असेल तर त्याकडे नक्कीच निरखून पाहायला हवं आणि काळजीही घ्यायला हवी, असा सल्ला अनेक मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांनी दिला आहे.
का म्हणतायत ते असं? एआयने पालकत्त्वाविषयक सल्ले देण्यात नेमकं काय गैर आहे? जगभरात किती पालक एआयचा वापर करतात? अशा सगळ्या प्रश्नांविषयी वाचा, सकाळ प्लसच्या या विशेष लेखामध्ये.