Premium|AI dairy farming: गायींच्या मेंदूत मायक्रोचिप बसवून दूध उत्पादन वाढवण्याचा प्रयोग!

Microchip in cows: रशियातील संशोधकांनी गायींच्या मेंदूत मायक्रोचिप बसवून दूधनिर्मिती वाढवण्याचा जगातील पहिला प्रयोग केला. या प्रयोगातून दुग्धउद्योगात नवी क्रांती घडू शकते
Microchip in cows

Microchip in cows

esakal

Updated on

अलीकडच्या काळात विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, मायक्रोचीप, ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी क्षेत्रातही नवनवे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सिंचन, खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण, संसाधनांचा योग्य वापर शेतीत केला जात आहे. एवढेच नव्हे, तर दूध उत्पादन क्षेत्रातही प्रीसिजन फार्मिंग, एआय आधारित आरोग्य तपासणी, रोबोटिक्स, दर्जेदार वंशनिर्मितीसाठी कृत्रिम रेतन, डेअरी व्यवस्थापनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान, आदींचा अनेक देशांमध्ये वापर होत आहे. त्यातून कृषीक्षेत्राची भरभराटही होताना दिसते.

आता तर दूध उत्पादनवाढीसाठी रशियातील स्टार्टअप कंपनी ‘नीरी’च्या संशोधकांनी एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. चक्क गायीच्या मेंदूत मायक्रोचीप बसवून, त्या माध्यमातून गायीची भूख, प्रजननशक्ती आणि दूधनिर्मिती वाढवण्याचा जगातील पहिलाच प्रयोग यशस्वी करण्यात आला. ‘नीरी’च्या संशोधकांनी एप्रिल महिन्यात हा प्रयोग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पाच गायींवर विशिष्ट शस्त्रक्रिया करून, त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूला एका विशिष्ट प्रकारचे यंत्र बसवण्यात आले. तसेच मेंदूत इलेक्ट्रोड मायक्रोचीप लावण्यात आली. ही संपूर्ण यंत्रणा एका सर्व्हरच्या माध्यमातून प्रयोगशाळेतून नियंत्रित करण्यात येते. या माध्यमातून इलेक्ट्रिक उत्तेजक देऊन, त्याद्वारे गायींची भूख, ताणतणाव, प्रजननक्षमता, दूध उत्पादन आदी बाबी नियंत्रित करून गरजेनुसार, त्या उत्तेजित करण्यात येतात. प्रायोगिक तत्त्वावर काही गायींमध्ये दुधाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढल्यास संशोधकांच्या निदर्शनास आले.

चाचणीवेळी गायी शुद्धीवर

रशियाच्या स्वेर्दलोव्हस्क प्रदेशात असलेल्या ‘नीरी’ संस्थेत हा प्रयोग करण्यात आला. त्यानुसार पाच गायींमध्ये न्यूरो-इम्प्लांट चीप यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रत्यारोपणादरम्यान गायी पूर्णपणे शुद्धीवर होत्या, असा दावा संशोधकांनी केला. शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांच्यात कोणत्याही शारीरिक व आरोग्यविषयक समस्या जाणवल्या नाहीत. एवढेच नव्हे, तर शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच या गायी चरायला बाहेरही पडल्या. मायक्रोचीप प्रत्यारोपणानंतर काही दिवसांच्या चाचण्यांनंतर गायींच्या दूध उत्पादनात वाढ झाल्याचे म्हटले जात असले, तरी ती वाढ नेमकी किती झाली, याबाबतची आकडेवारी कंपनीने अद्याप जारी केलेली नाही.

...तरच व्यावसायिक वापर

संशोधक सध्या गायींच्या दूध उत्पादनवाढीसंदर्भात विविध प्रयोग करीत आहेत. त्यानुसार समोर आलेल्या निष्कर्षानुसार पुढील प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार आहे. उदा. गायीची भूक कमी झाली, तर ती पुन्हा वाढवण्यासाठी संबंधित यंत्रणा न्यूरो-मॉड्युलेशनद्वारे उत्तेजना दिली जाईल. सध्या ही संपूर्ण प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात असल्याने, त्यात आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्यानंतरच हा प्रयोग व्यापक पातळीवर राबवायचा की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

व्यावसायिक वापर कधी?

जगभरात दूध उत्पादनवाढीसाठी विविध प्रयोग करण्यात आले. गायी, म्हशींच्या विविध प्रजाती विकसित करण्यात आल्या; परंतु ठरावीक कालावधीनंतर या प्रयोगांनाही मर्यादा येत आहेत; परंतु भूखवाढीसह दूध उत्पादन वाढवण्यासाठी मायक्रोचीप प्रत्यारोपणाचा प्रयोग दुग्धनिर्मिती क्षेत्रात क्रांती घडवू शकतो. सध्या सुरू असलेल्या प्रयोगाबाबत आणखी निष्कर्ष पुढे आल्यानंतर आणखी काही गायींमध्ये ही मायक्रोचीप बसवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. हा प्रयोग व्यावसायिक पातळीवर राबवण्याविषयी सध्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मुळात हा प्रयोग बराच खर्चिक आणि उच्च जोखमीचा असल्याने, तो सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तुलनेत व्यावसायिक दूध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडूनच राबवला जाण्याची शक्यता आहे.

गंभीर दुष्परिणामांची शक्यता

नीरीच्या संशोधकांनी सध्या प्रायोगिक तत्त्वावर पाच गायींच्या मेंदूमध्ये मायक्रोचीप बसवली आहे. सुरुवातीला त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत; परंतु थेट मेंदूमध्ये चीप बसवल्यानंतर संबंधित यंत्रणेतून दिल्या जाणाऱ्या उत्तेजनांचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास त्याचा गायींच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रसंगी पक्षाघात, एपिलेप्सी, अर्धांगवायू, फीट येण्यासारखे आजार उद्भवण्याची भीती असते.

..

वाढत्या लोकसंख्येबरोबरच जगातील दुधाची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी अधिक दूध देणाऱ्या गायी, म्हशींच्या प्रजाती विकसित केल्या जात आहेत. त्यातच आता रशियातील एका स्टार्टअपने गायींच्या मेंदूत मायक्रोचिप बसवत, त्याद्वारे दूध उत्पादन वाढवण्याबाबत आगळावेगळा प्रयोग करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com