Premium|Future of Jobs : शिंपी, वेल्डर्स, प्लंबर्स; रोबोट्समुळे रोजगाराच्या जगात होणार मोठे बदल

Future of Jobs : कृत्रिम बुद्धिमत्ता आता केवळ मजकूर किंवा चित्रनिर्मितीपुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष कामगारांची कौशल्ये शिकून रोबोट्सना सक्षम करत आहे, त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल घडू शकतात.
Future of Jobs

Future of Jobs

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर - saptrang@esakal.com

सर्वांत जास्त काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये एनन्व्हिडीया, गुगल डीपमाइंड, टेस्ला, फिगर एआय, बॉस्टन डायनॅमिक्स, अँजिलिटी रोबॉटिक्स, सँक्च्युअरी एआय, कोव्हेरिअन्ट आणि इतर अनेक स्टार्टअप्स आहेत. त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे - रोबोट्सना "डोळे, मेंदू आणि हात" देणं. याचा अर्थ स्पष्ट आहे. अनेक जुन्या कौशल्यांची मागणी कमी होईल.

आजपर्यंत अनेकांना वाटायचं, की एआय म्हणजे फक्त ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील. तसंच पुढच्या २०-३० वर्षांत ड्रायव्हरलेस कार्स, बसेस, ट्रॅक्टर्स आणि ट्रेन्स आल्या, की जगामध्ये कोट्यवधी ड्रायव्हर्सचे जॉब्ज जातील. पण गेल्या काही वर्षांत एक वेगळीच गोष्ट घडायला लागली आहे. आता एआय फक्त मजकूर लिहीत नाही किंवा फोटोज किंवा व्हिडिओज तयार करत नाही, तर तो माणसाच्या हातानं केलं जाणारं प्रत्यक्ष कामही त्याचं निरीक्षण करून शिकायला लागला आहे. यासाठी कंपन्या कामगारांच्या डोक्यावर किंवा छातीवर लावलेले कॅमेरे, सेन्सर्स, स्मार्ट ग्लासेस आणि रोबॉट्स वापरत आहेत. थोडक्यात कामगार स्वतःच्या हातानं स्वतःचं थडगं खणतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com