
ऊस हे पीक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, कमी उत्पादन, कारखान्यांची कमी गाळप क्षमता आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी येतात. या अडचणी कमी करून शेतकऱ्यांना एक नवीन आणि शाश्वत संधीचा लाभ मिळावा, यासाठी आता AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ऊसाच्या शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणार आहे.
नुकताच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT), महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन यांच्यात या संदर्भात एक महत्त्वाचा करार झाला आहे. या उपक्रमाने जागतिक स्तरावरही लक्ष वेधलेलं आहे, ज्यात अमेरिकेतील ७१ आणि यूकेमधील १६ शास्त्रज्ञांचे योगदान आहे.
शिवाय, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामधल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांशी पार्टनरशिप करण्यात आली आहे, ज्यामुळे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. नेमका काय करार झालाय? या कराराचा फायदा काय? आपले शेतकरी याबद्दल काय म्हणतायत? हे सगळं वाचा ‘सकाळ प्लस’ च्या या विशेष लेखात...