Ai mental health Therapy
esakal
पुणे - मिनू... काहीशी डोळ्यात पाणी आणूनच सांगत होती. आज माझं माझ्या मित्रासोबत भांडण झालं. त्याला त्याचं करियर करायचं आहे. त्यासाठी त्याला वेळ हवा आहे. माझ्या घरी मात्र आता लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता आमच्या नात्याचं काय होणार..? तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याने सगळेच अनिश्चित आहे. हा प्रश्न मी जेव्हा एआयला विचारला तेव्हा त्याने मला पुढच्या दहा वर्षात तू कुठे असशील याचा विचार कर असे सांगितले. तू तुझ्या करियचे काय करणार आहेस असे विचारले.. तसेच काही तात्पुरते पण खरोखरच पटण्याजोगे पर्याय सुचवले.. कालपासून फारच रडू येत होतं पण एआयशी बोलल्यावर जरा बरं वाटलं. वयाच्या पंचविशीत असणारी मिनू (अर्थातच नाव बदलले आहे) सांगत होती.
भारतातच काय जगभरातील लोक आता आपले वैयक्तिक प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विचारत आहेत. एवढेच नाही तर काही चॅटबॉट हे ‘एआय थेरपिस्ट’ म्हणून काम करत आहेत. आणि आता संशोधनाने देखील हे सिद्ध केलं आहे की, एआय चॅटबॉट हे चांगले थेरपिस्ट म्हणून काम करत आहेत.
पण हे कोणतं संशोधन आहे, हे संशोधन कुठं झालंय, कधी झालंय, यामध्ये कोणत्या एआय थेरपिस्ट अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आला होता, यात कोणत्या थेरपी दिल्या जातात, एआयशी बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे, एआय जर सगळं करत असेल तर मानसिक उपचारासाठी आता डॉक्टर आवश्यक असणार की नाही..? असं सगळं या सकाळ+ च्या विशेष लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.