Premium : THE END OF A GLORIOUS TEST ERA : अजिंक्य रहाणेची निवृत्ती अन् एक पिढी घडवणाऱ्या सुवर्णकाळाचा शेवट…

Ajinkya Rahane retirement ends India's Golden Six era: अजिंक्य रहाणे निवृत्त झाला... आणि भारतीय कसोटी क्रिकेटच्या एका सुवर्णयुगावर अखेर पडदा पडला. ही केवळ एका फलंदाजाची निवृत्ती नाही; तर विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे या सहा खेळाडूंनी घडवलेल्या भारतीय कसोटीच्या 'Golden Six' युगाचा अधिकृत शेवट आहे.
Ajinkya Rahane's Retirement Closes a Glorious Test Era

Ajinkya Rahane's Retirement Closes a Glorious Test Era

esakal

Updated on

Ajinkya Rahane's Retirement Closes a Glorious Test Era : अजिंक्य रहाणेने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून आंतरराष्ट्रीय आणि सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. संपूर्ण इंग्रजीत असलेल्या या व्हिडीओमध्ये जेव्हा भावनांना वाट मोकळी करण्याची वेळ आली तेव्हा अजिंक्य मराठीत व्यक्त झाला.. म्हणाला, तुम्ही मला केव्हाच परकं केलं नाहीत... त्याच्या डोळ्यांतील अश्रू काळजाला भिडणारे होते. अजिंक्य हा तसा नेहमीच अनेकांच्या फेव्हरिट लिस्टमधला खेळाडू... विराट कोहली, रोहित शर्मा या खेळाडूंसमोर जिथे संघातील अन्य खेळाडूंचा तेज कमी वाटायचा, त्यातही अजिंक्यने आपला ठसा उमटवला... अजिंक्यने निवृत्ती जाहीर केली आणि डोळ्यासमोर एडिलेड कसोटी, लॉर्ड्सचं मैदान अन् सेना देशांमधील त्याची शतकं झपझप उभी राहिली... पण, त्याच्या निवृत्तीने एक पिढी घडवणारी टीम आता गेली, ही चटका देणारी गोष्टही समोर आली..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com