
अॅड. श्रीनिवास बिक्कड
देशात सध्या सर्वांत जास्त निवडणूक आयोग आणि मतचोरीची चर्चा आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या एकूणच प्रतिमेला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याच्या घटना पाहिलेल्या आहेत, पण निवडणूक आयोगच सत्ताधारी पक्षाला अनुकूल असे काम करत असेल तर त्या निवडणुका हा केवळ ‘फार्स’ आहेत का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. ही परिस्थिती निर्माण होण्यास निवडणूक आयोगच जबाबदार आहे.
राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली. निवडणूक आयोगाला भारतीय राज्यघटनेच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. निवडणूक आयोग ही एक स्थायी घटनात्मक संस्था आहे.