Premium|American soft power decline : अमेरिकी प्रभावाच्या ऱ्हासाची सुरवात

Decline of American soft power under Donald Trump analysis : अमेरिकेने आजपर्यंत जगाचे नेतृत्व केले ते त्यांच्या संवेदनशील आणि विवेकी वागणुकीतून. अनेक जागतिक संस्थांमध्ये या देशाने आर्थिक आणि अन्य जबाबदाऱ्या घेऊन सगळ्या देशांमध्ये स्वतःबद्दल एक विश्‍वास निर्माण केला आणि त्यातूनच त्या देशाबद्दल अनेक देशांना आकर्षण निर्माण झाले होते. मात्र सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धाक, दडपशाही आणि असंस्कृतपणा याचेच दर्शन घडवले आहे. त्यातून अमेरिकेबद्दल कुणाला विश्‍वास वाटेनासा झालाय.
Decline of American soft power under Donald Trump analysis

Decline of American soft power under Donald Trump analysis

esakal

Updated on

मनीष दाभाडे - आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषक आहेत.

दावोस येथील जागतिक आर्थिक मंचावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच दिलेले भाषण हे केवळ एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे धोरणात्मक वक्तव्य नव्हते, तर ते आजच्या अमेरिकन सॉफ्ट पॉवरच्या अवस्थेचे उघड आणि अस्वस्थ करणारे प्रतिबिंब होते. बहुपक्षीय संस्थांविषयी उपेक्षा, सहयोगाऐवजी दबावाची भाषा, आणि जागतिक जबाबदाऱ्यांपेक्षा संकुचित राष्ट्रीय हितांवर दिलेला भर या साऱ्यांचे ते भाषण एकत्रित रूप होते. त्याच मंचावर, काही अंतराने, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दिलेले भाषण मात्र पूर्णपणे वेगळ्या विश्वातील वाटले. नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे संरक्षण, आर्थिक एकात्मतेचे शस्त्रीकरण होण्याचे धोके, आणि मध्यम शक्तींनी एकत्र येऊन वर्चस्ववादी प्रवृत्तींना रोखण्याची गरज यावर त्यांनी ठामपणे भर दिला. ही दोन भाषणे एकत्र वाचली, तर आजच्या जागतिक व्यवस्थेत अमेरिका आकर्षणाचे केंद्र राहिलेली नाही, तर अस्वस्थता, अविश्वास आणि अनिश्चिततेचे कारण बनत चालली आहे, हे स्पष्टपणे समोर येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com