
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com
‘शोले’ प्रदर्शित होईपर्यंत गब्बरसिंग ही व्यक्तिरेखा खुलवणारा अमजद खान यांच्याबद्दल चित्रपट रसिकांत उत्सुकता होती; पण तो इतका जालिम असेल अशी फार कोणी कल्पनाच केली नव्हती. चित्रपटात संजीवकुमार वगैरे मोठमोठे कलाकार असतानाच अशा नवीन खलनायकाकडे फार कोण कशाला लक्ष देईल? सिनेमात एक खलनायक असतो तसा तो आहे हे फर्स्ट इम्प्रेशन.
दरम्यान, फस्ट डे फर्स्ट शो सुरू झाला...
सलिम जावेदची बंदिस्त पटकथा आणि दमदार संवाद असलेला हा चित्रपट जसजसा पुढे सरकला तसतशी प्रेक्षकांना गब्बरसिंगची प्रचंड दहशत वाटू लागली. सत्तर एमएमचा विशाल पडदा व स्टीरिओफोनिक साउंड सिस्टीम यामुळे ही प्रतिमा अक्राळविक्राळ ठरू लागली. पडद्यावरच्या खलनायकाला घाबरणे हीदेखील एक परंपरा होती.