Premium|Study Room : २०२२ मध्ये पीएसआयच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अमोल घुटुकडे यांची मुलाखत!

PSI Interview Experience : सातारा जिल्ह्याच्या अमोल घुटुकडे यांनी पीएसआय मुलाखतीत २८ गुण मिळवून यश संपादन केले. शारीरिक चाचणीतील उत्कृष्ट ९७.५ गुण आणि मुलाखतीतील आत्मविश्वासपूर्ण उत्तरांमुळे पॅनेलने त्यांच्या शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्वाचे आणि शारीरिक क्षमतेचे विशेष कौतुक केले आहे.
PSI Interview Experience

PSI Interview Experience

esakal

Updated on

अमोल घुटुकडे (PSI-२०२२)
(मुलाखतीत प्रथम - २८ गुण)
मुलाखतीची वेळ : ८ मिनिटे
पॅनेल : देवानंद शिंदे सर, मेंबर १ : IPS सर

अमोल घुटुकडे : आत येऊ सर?
शिंदे सर : या, टोकन दाखवा लांबून आणि येऊन नंबर सांगा.
अमोल घुटुकडे : (टोकन नंबर दाखवला आणि सांगितला) बसू का सर?

प्रश्न : बसा, नाश्ता केला का? काय खाल्लं?
उत्तर : हो सर, उडीद वडा खाल्ला.

प्रश्न : छान, आम्हाला तुमची काळजी आहे. १ वाजता आलेत. मुलांना विचारावं लागतं नाश्ता केलात का म्हणून.
उत्तर : होय सर.

प्रश्न : (Profile दाखवून) यामधील फोटो तुमचाच आहे का? फोटोमध्ये वेगळे दिसताय, आता केस असे का कापलेत?
उत्तर : पोलीस Dept. हे एक शिस्तप्रिय Dept. आहे. एक शिस्तप्रिय look दिसण्यासाठी अशा प्रकारे केस कापलेत.

प्रश्न : सध्या कोणत्या post वर आहात का?
उत्तर : नाही सर.

प्रश्न : आता Clerk च्या एवढ्या जागा आहेत, त्यामध्ये झालंय का तुमचं? एवढे दिवस काय करताय?
उत्तर : Clerk साठी नाहीये. आत्तापर्यंत मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे.

प्रश्न : घरी कोण कोण असतं? शेती किती आहे? वडील आणि आई काय करतात?
उत्तर : वडील शेती करतात आणि शेळीपालन करतात. आई त्यांना मदत करते. शेती २ एकर आहे. एक भाऊ आणि एक बहीण आहे.

प्रश्न : घरची परिस्थिती नाही, तर मग जॉब करायचा ना?
उत्तर : सर, मी २०१८ ला Degree pass out झाल्यापासून एक वर्ष जॉब केला. परंतु त्या क्षेत्रात समाधान नसल्यामुळे मी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी ठरवून आलो.

प्रश्न : Degree कशामध्ये झाली?
उत्तर : BE Electronics & Telecommunication

प्रश्न : Physical ला किती मार्क आहेत?
उत्तर : ९७.५ सर

प्रश्न : खूपच छान मार्क घेतले. (Very Good) (IPS सरांकडे बघून म्हणाले, ‘सर पहा, Candidate खूपच fit दिसतोय.’)
उत्तर : Thank you Sir!

प्रश्न : Lead किती?
उत्तर : Open ४१.५, Category - ५५.५

प्रश्न : तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आलात?
उत्तर : सातारा

प्रश्न : मी तुम्हाला जिल्हा सोडून वेगळे प्रश्न विचारतो. सांगा, दादाभाई नौरोजी यांचे टोपण नाव काय आहे?
उत्तर : (मला आठवलं नाही) Sorry Sir, मी वाचलेय पण मला आठवत नाही.

प्रश्न : त्यांची राजकीय कामगिरी सांगा.
उत्तर : १८८६ ला राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी दारिद्र्यावर पण काम केले आहे. जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे सनदशीर कार्य केले.

प्रश्न : थांबा आता.. बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव सांगा.
उत्तर : लोकमान्य

प्रश्न : मुख्यमंत्र्यांनी एक योजना आणली आहे, तीर्थक्षेत्र दर्शनाची. ती कोणासाठी आणि वय काय?
उत्तर : (मी वय ६१ पासून पुढील लोकांसाठी आहे असे सांगितले आणि कोणासाठी हे सांगताना मी म्हटलं, वृद्ध लोकांसाठी.)

प्रश्न : म्हणजे तुम्ही प्रशासनामध्ये गेल्यावर आम्हाला वृद्ध समजणार काय?
उत्तर : Sorry Sir, मला आठवत नाही.

प्रश्न : अहो, ज्येष्ठ नागरिक असं आहे ना ते.
उत्तर : हो सर, असंच आहे.

PSI Interview Experience
Premium|Study Room : तृप्ती चव्हाण यांनी इतक्या सहज मुलाखत कशी दिली? त्यामागे मेहनत काय होती?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com