

Police Sub Inspector Interview Tips
esakal
आधिकाऱ्याचे नाव
तृप्ती सुधाकर चव्हाण
पोलीस उपनिरीक्षक २०१९
महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी २०२२
मुलाखतीची कालावधी :१६ ते १८ मिनिट
पॅनेल मा. देशपांडे सर
मेंबर १ - मा. रजनीश सेठ सर
मेंबर २ - मा. महेश शिंदे सर
पॅनेल
मा. देशपांडे सर
टोकन द्या व क्रमांक सांगा.
प्रश्न : फोटो तुमचाच का? कधीचा? काय फरक आता तुमच्यात?
उत्तर : होय सर, माझाच आहे. सर, फोटो २०१९ चा आहे. सर, फोटोमध्ये मी सलवार घातलेला आहे व केस मोकळे आहेत. सध्या मी साडी घातलेली आहे व सोबत केस बांधलेले आहेत. (सरांनी सुचविले, फोटो बदलून घ्या.)
प्रश्न : अॅग्रिकल्चर झाले आहे, मग कडधान्य सांगा.
उत्तर : सांगताना मी ‘मिलेट्स’ने सुरुवात केली. मी थोडी गोंधळले होते व सध्या मिलेट्स फार चर्चेत असल्यामुळे ते झाले असावे.
प्रश्न : कडधान्य विचारले मॅडम.
उत्तर : मग नीट १० कडधान्य सांगितले. अगोदर पण मी १० सांगितले होते. कडधान्य : मूग, मटकी, चना, चवळी, राजमा, काळा घेवडा, पांढरा घेवडा, बाजरी, तीळ, तूर. मिलेट्स - बाजरी, नाचणी, कांगणी, राळे, वरी, राजगिरा, कुट्टू, जव, कोडो, कोदरा.
प्रश्न : २०२३ हे कुठले वर्ष म्हणून साजरे करत आहात?
उत्तर : इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून आपण २०२३ हे वर्ष साजरे करतो आहोत.