
सुदर्शन चव्हाण
chavan.sudarshan@gmail.com
२०२०चा लॉकडाऊन लागला होता. सगळे आपापल्या घरात बंद होते. त्यामुळे टीव्हीवर काहीतरी पाहणं अर्थातच वाढलं होतं; पण ‘चांगलं’ आणि ‘नवीन’ हे दोन्ही एकत्र मिळत नव्हतं. जे चांगलं बघायचं राहून गेलं होतं, ते आपण बघत होतो किंवा नवीन येत होतं ते चांगलं निघतच होतं, असं नाही.
त्याच वेळेला ॲमेझॉन प्राइमवर ‘पंचायत’ वेबसीरिज आली आणि हे दोन्ही एकत्र बघायला मिळालं. शहरातला एक एमबीए करू इच्छिणारा तरुण काही करणाने अचानक गावात ग्रामसेवक म्हणून रुजू होतो आणि इथून पुढे सुरू होते ‘पंचायत’ची कथा.