
UPSC exam analysis
esakal
युगांक गोयल, कृती भार्गव
यूपीएससी सनदी सेवा परीक्षांसंदर्भातील अहवाल या प्रक्रियेत किती कठीण, गुंतागुंतीची अन् किती तीव्र स्पर्धा आहे याचे प्रभावी चित्र उभे करतात. वाढणारी स्पर्धा, तसेच या परीक्षांच्या संरचनात्मक अडथळ्यांमुळे उमेदवारांवर प्रचंड मानसिक दडपण येते.
या अहवालांद्वारे या परीक्षेचे स्वरूप, तीव्र स्पर्धा नीट समजून घेणे हे भावी इच्छुकांसाठी अत्यावश्यक आहे. कारण यामुळे त्यांना केवळ त्यांच्यासमोरील आव्हानांचा अंदाजच नाही, तर समोरच्या मर्यादित संधींचा मार्गदर्शक नकाशाही समजण्यास मदत होते.