Analysis Paralysis
Esakal
पुणे - एवढा कुठं विचार करत बसता, करून टाका..! हे वाक्य तुम्हाला तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडून कधी ना कधी हमखास ऐकायला मिळाले असेल. अनेकांना हा अनुभव आलेला असेल की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही इतकी माहिती घेत जाता किंवा इतका विचार करत जाता की तुम्ही फक्त विचारच करत बसता. कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचतच नाही. मग तो साधा फोन घ्यायचा असो किंवा आयुष्याचे निर्णय असो. आपल्याला निष्कर्षापर्यंत येताच येत नाही. असं एखाददुसऱ्या गोष्टीत झालं तर ठीक आहे पण प्रत्येकच निर्णयाच्या बाबतीत असं होत असेल तर..? तर कदाचित हे Analysis Paralysis किंवा Decision Paralysis असू शकतं. शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर ‘निर्णय लकवा’.
पण मग हे Analysis Paralysis होणे म्हणजे काय? मुळात हे का होतं? फक्त व्यक्तीगत पातळीवर असतं की संस्थात्मक पातळीवर देखील अशा गोष्टी होतात? याचा मानसिक आरोग्याशी काही संबंध आहे का? मला Analysis Paralysis होतो आहे हे कसं ओळखायचं? आणि होत असेल तर त्याच्याशी कसं डील करायचं? हे सगळं आपण सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.