
New political parties India
esakal
संजय कुमार
बिहार निवडणुकीचे वेध आता लागले आहेत. या निवडणुकीतील राजकीय समीकरणे कशी असतील, याबाबत उलटसुलट कयास केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक, रणनीतिकार प्रशात किशोर यांनी स्थापन केलेला जनसुराज पक्ष किती आव्हान निर्माण करतो याबाबत उत्सुकता आहे. विविध राज्यांत यापूर्वीही नवे पक्ष स्थापन झाले आहेत. त्यापैकी काहींना निवडणुकांत भरघोस यश मिळाले, काहींना मध्यम यश, तर काहींना अपयशही मिळालेले आहे. याचा केलेला उहापोह...
भारतीय लोकशाही ही आपल्या विविधतेमुळे जगात एक अनोखा प्रयोग मानली जाते. इथे एकीकडे राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेससारख्या प्रस्थापित पक्षांचे वर्चस्व दिसते, तर दुसरीकडे प्रादेशिक पातळीवर असंख्य पक्ष स्थापन होऊन लोकांचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. नव्या पक्षांचा उदय हा लोकशाहीच्या गतिमानतेचे लक्षण आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेत सर्वाधिक चर्चेत येणारा प्रश्न म्हणजे, नवीन पक्षांना कितपत संधी मिळते? ते पहिल्याच निवडणुकीत यश मिळवतात की अपयशाच्या गर्तेत जातात?