

War animals armour
esakal
माणूस निसर्गातल्या बाकी सजीवांपेक्षा फार वेगळा आहे. माणूस निसर्गातला एकमेव असा प्राणी आहे, जो दुसऱ्या प्राणिपक्ष्यांना पाळू शकतो! भटकं जगणं सोडून माणूस शेतीकडे वळला आणि अनेक कामांसाठी, विशेषत: प्रवास, शिकार, ताकदीची कामे अशांसाठी त्याला कृत्रिम आधाराची गरज वाटायला लागली. माणसाने बल, वेग, क्रौर्य, आकार यांमध्ये त्याच्याहून कित्येक पटीने श्रेष्ठ असणाऱ्या प्राण्यांना पाळले व त्याच्या अफाट बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली.