
डॉ. गणेश मर्गज
कोकणात मानवाच्या उत्पत्तीच्याही आधीच्या खुणा आजही जिवंत आहेत, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती वाटेल. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'मायरिस्टीका स्वॅम्प' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दलदलीच्या वनस्पती संपदेमुळे ही बाब खऱ्या अर्थाने उलगडते.
विशेष म्हणजे, सिंधुदुर्गमध्ये एका नव्हे, तर दोन ठिकाणी हा लाखो वर्षांपूर्वीचा निसर्गखजिना आजही सजीव स्वरूपात अस्तित्वात आहे. 'मायरिस्टीका स्वॅम्प' म्हणजे दलदलीचा असा प्रदेश, जिथे वर्षभर पाणी साचलेले असते किंवा संथ गतीने वाहत असते. अगदी पश्चिम घाटाच्या निर्मितीच्याही आधी याचा जन्म झाला. कोकणातील या अत्यंत प्राचीन आणि दुर्मीळ पर्यावरणीय रत्नाविषयी....