
Andhra Pradesh free bus travel for women
esakal
आंध्र प्रदेशमध्ये ‘स्त्री शक्ती’ या मोफत बस प्रवासाच्या योजनेने महिला प्रवाशांसाठी एक नवीन क्रांती घडवून आणली आहे. ही योजना सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला असून, याचा फायदा कोट्यवधी महिलांनी घेतला आहे. राज्याच्या परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेमुळे केवळ महिलांच्या प्रवासाचा खर्चच वाचला नाही, तर सार्वजनिक वाहतुकीच्या वापरातही लक्षणीय वाढ झाली आहे.
ही ‘स्त्री शक्ती’ योजना नेमकी काय आहे? एका महिन्याच्या कालावधीत योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी किती? आणि या योजनेमुळे महिलांचं सक्षमीकरण करण्यात कसा फायदा होईल? हे सगळं आपण आजच्या 'सकाळ प्लस'च्या लेखात वाचणार आहोत...