Premium|Amazing Animal World : प्राण्यांचे जग अनुभवण्याची कुतूहलजनक गोष्ट

Amazing Animal World and Wildlife Behaviour : डॉ. नीलिमा कुलकर्णी यांच्या ‘अनोखे प्राणीविश्व’ पुस्तकातून प्राण्यांचे नैसर्गिक जीवन, अन्नासाठीचा संघर्ष, सहकार्य, फसवणूक आणि जगण्यासाठीच्या उत्क्रांतीतील विलक्षण युक्त्यांची ओळख होते.
Amazing Animal World

Amazing Animal World

esakal

Updated on: 

डॉ. संजय जोशी - sakal.avtaran@gmail.com

प्राणी-पक्ष्यांच्या जगाकडे आपण अनेकदा माणसाच्या नजरेतून पाहतो. एखादा प्राणी ‘हुशार’, एखादा ‘भोळा’, एखादा ‘धूर्त’, तर एखादा ‘विश्वासू’ अशी विशेषणे आपण सहज लावतो. या मानवी दृष्टिकोनाला हजारो वर्षांची परंपरा आहे. इसापच्या बोधकथांमध्ये तर प्राणी आणि पक्षी माणसांसारखे बोलतात, विचार करतात, योजना आखतात आणि त्यांच्या कृतीतून माणसाला नीतीचा धडा मिळतो. मात्र, या परिचित प्राणीजगताच्या पलीकडे प्रत्यक्ष निसर्गात घडणारे प्राण्यांचे जीवन तितकेच विलक्षण, नाट्यमय आणि कुतूहलजनक आहे. डॉ. नीलिमा कुलकर्णी यांच्या ‘अनोखे प्राणीविश्व’ या पुस्तकातून याच वास्तव प्राणीविश्वाची ओळख होते.

इसापनीतीतील प्राण्यांच्या गोष्टींचा संदर्भ घेत लेखिकेने वाचकाला एका वेगळ्याच प्रवासावर नेले आहे. इसापच्या कथांमधील प्राणी हे जणू माणसांचे प्रतिनिधी असतात; परंतु या पुस्तकातील प्राणी स्वतःच्या नैसर्गिक जगात जगणारे, संघर्ष करणारे, जोडीदार निवडणारे, पिल्लांचे संगोपन करणारे आणि आपल्या अस्तित्वासाठी सतत प्रयत्नशील असलेले जीव म्हणून आपल्यासमोर येतात.

Loading content, please wait...