
Apple Foxconn crisis: फॉक्सकॉन ही कंपनी दक्षिण भारतातील अॅपल उत्पादनाचे कारखाने चालवते. या कारखान्यांतून नुकतेच शेकडो चिनी कर्मचारी, तंत्रज्ञ, अभियंते चीनमध्ये परत गेले. म्हणजे काम संपवून नव्हे तर चीनने बोलावलं म्हणून.
फॉक्सकॉन ही तैवानी कंपनी आयफोन निर्मितीतील एक प्रमुख उत्पादन कंपनी आहे. तैवान हा आपलाच भाग असण्याचा दावा करणाऱ्या चीनने कायमच या कंपनीवरही दावा सांगितला आहे. सध्या मात्र फॉक्सकॉनच्या भारतातील अॅपल प्लँट्समधून चीनी कर्मचाऱ्यांना मायदेशी पाठवण्यात आलं. असं का झालं, फॉक्सकॉनने त्यांना काढलं की चीनने आपल्या तज्ज्ञ लोकांना परत बोलवून घेतलं. मुळात चीनने हे केलंच का??
या वरवर साध्या वाटणाऱ्या घटनेचे अनेक पैलू आहेत. भारत-चीन संघर्ष, चीन-अमेरिकेतल्या व्यापार धोरणविषयक वाद अशा बऱ्याच पैलूंचा त्यात समावेश आहे. हे मुद्दे समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.