Premium|Liang Metanduno cave painting : इंडोनेशियातील लियांग मेटांडुनो गुहेतील ६७,८०० वर्षे जुने चित्र; प्राचीन कलेचा नवा आयाम

Prehistoric human cave art : इंडोनेशियातील सुलावेसीमध्ये ६७,८०० वर्षे जुन्या मानवी हाताच्या ठशांचा शोध लागला असून, या जागतिक शोधामुळे पुरातन कलेचा मान युरोपऐवजी आशियाला मिळाला आहे, ज्याने मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाला एक नवीन वळण दिले आहे.
Prehistoric human cave art

Prehistoric human cave art

esakal

Updated on

राकेश मोरे - rakesh.more@esakal.com

इंडोनेशियातील सुलावेसी भागातील घनदाट जंगलात एका प्राचीन गुहेत मानवी हाताचा असा एक ठसा सापडला, ज्याने जगाचा इतिहास बदलण्यास भाग पाडले. हे गुहाचित्र तब्बल ६७,८०० वर्षे जुने असल्याचा दावा पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी केला. या शोधामुळे जगातील सर्वात प्राचीन कलेचा मान आता युरोपऐवजी आशियातील इंडोनेशियाला मिळाला आहे. मानवी उत्क्रांतीचा एक नवा आयाम त्यातून उद्‍धृत होतो!

जागतिक पातळीवर इंडोनेशिया एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. इंडोनेशियाला निसर्गसंपन्नतेचे मोठे वरदान लाभले आहे. इंडोनेशियातील बाली, माउंट अगुंग, जावा यांसारख्या भागातील अनेक ठिकाणे केवळ अद्‍भुत अशीच. इंडोनेशियाच्या आग्नेय सुलावेसीजवळील मुनाचा उष्णकटिबंधीय बेटसमूह... हिरव्यागार झाडांनी वेढलेले डोंगर, चुनखडीच्या गुहा आणि त्यांच्यात दडलेला हजारो वर्षांचा इतिहास. या बेटावरील लियांग मेटांडुनो नावाची गुहा स्थानिकांसाठी काही नवीन नाही. सुलावेसी बेटावर प्राचीन चित्र असलेल्या जवळपास २४२ गुहा आहेत. दरवर्षी त्यात भर पडत असते. तेथे भिंतींवर रंगवलेल्या उडणाऱ्या मानवी आकृत्या, प्रवाशांनी भरलेली बोट, घोड्यावर स्वार झालेले योद्धे, कोंबड्या, डुक्कर आदी अनेक चित्रांकडे पाहत लोक थक्क होतात. लाल, तपकिरी आणि काही ठिकाणी काळ्या रंगात रेखाटलेली ही चित्रे काही हजार वर्षांपूर्वीची मानली जात होती; परंतु २०१५ मध्ये एक संशोधक या गुहेत वेगळ्याच शोधासाठी आला. त्याचं नाव आधि अगुस ओक्टावियाना.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com