

Climate change and sea ice
esakal
लेखक - सागर रेपाळे
आर्क्टिक समुद्री बर्फ जागतिक हवामान संतुलन राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. तो सूर्यप्रकाश परावर्तित करून पृथ्वीचे ऊर्जा संतुलन राखतो आणि ध्रुवीय प्रदेश थंड ठेवण्यास मदत करतो.
बर्फातील बदलांचा जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतो. ध्रुवीय अस्वल, वालरस यांसारख्या प्राण्यांचे अस्तित्व समुद्री बर्फावर अवलंबून आहे. तसेच, आर्क्टिकमधील स्थानिक आदिवासी समुदाय त्यांच्या शिकारी, प्रजनन आणि स्थलांतरासाठी समुद्री बर्फावर अवलंबून असल्याने त्यांच्या जीवनशैलीवरही परिणाम होतो.