
कल्याणी शंकर
गेले वर्ष भारतासह अनेक महत्त्वाच्या देशातील निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने अर्थात ‘एआय’ने महत्त्वाची भूमिका बजावली. एकूण मतदानाचा अंदाज घेणे, मतदारांच्या भूमिकेतील बदल ओळखणे, मतदारांचा प्राधान्यक्रम समजावून घेणे, प्रचार मोहिमेचे वेळापत्रक तयार करणे आणि विशिष्ट मतदारांसाठी प्रचार मोहीम आयोजित करणे अशा अनेक गोष्टींसाठी ‘एआय’चा वापर केला गेला.
वर्षाखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीतही ‘एआय’चा वापर होणार आहे. ‘एआय’मुळे राजकीय प्रचार, मतदारांशी संवाद आणि निवडणूक व्यवस्थापन कसे बदलू शकते, यावर जगभर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. भारतातही त्याची सुरुवात झाली आहे.