
Animal Communication
esakal
प्राण्यांचा संवाद केवळ आवाजापुरता मर्यादित नाही. अनेक प्रजाती देहबोली, गंध, रंगातील बदल आणि अगदी विद्युत संकेतांवर अवलंबून असतात. एखाद्या व्हेलला आपण संदेश पाठवू शकलो, की ‘अहो, इकडे जहाजांचा मार्ग आहे, दुसरीकडे जा!’ हे जर शक्य झाले तर? आता हे सगळे केवळ स्वप्न नाही; तर एक वैज्ञानिक शक्यता बनत चालली आहे...
लहानपणी बहुतेकांनी डॉ. डूलिट्लची कथा ऐकली असेल. प्राण्यांशी बोलता येणारा तो डॉक्टर आपल्यालाही नेहमीच आकर्षित करायचा; पण ती तर फक्त कल्पनाच होती ना? मग जर आता सांगितले, की ही कल्पना वास्तवात उतरणार आहे, तर? जर आपण व्हेलच्या गाण्याचा अर्थ समजून घेऊ शकलो, हत्तींच्या चित्कारण्यातला संदेश उलगडू शकलो किंवा पक्ष्यांच्या किलबिलाटाचे रहस्य जाणून घेऊ शकलो तर? आता हे सगळे केवळ स्वप्न नाही; तर एक वैज्ञानिक शक्यता बनत चालली आहे आणि त्यामागचा जादूगार आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच एआय.