

Artificial Intelligence
sakal
संदीप वासलेकर-saptrang@esakal.com
दुबईतील ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हपासून ते साओ पाउलो येथील होरासिस वार्षिक बैठकीपर्यंत अनेक उद्योग नेत्यांच्या परिषदांमध्ये गेल्या काही महिन्यांत मी सहभागी झालो. उद्योग क्षेत्रातील नेत्यांसाठी ‘एआय’ हा आता नवीन आवडता विषय आहे. परंतु बहुतेक उद्योग नेत्यांना ‘एआय’ म्हणजे काय याची खूप उथळ स्वरूपाची समज आहे.