
सुनील चावके, नवी दिल्ली
काँग्रेसने जोर लावल्यास मुस्लिम आणि दलितबहुल २० मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाचे गणित बिघडू शकते. तेवढी वातावरण निर्मिती काँग्रेसला करता येईल याची शंकाच आहे. मुस्लिम मतदार आपली मते वाया जाऊ देणार नाहीत.
ती ‘आप’च्याच पारड्यात पडण्याची शक्यता अधिक. काँग्रेसमुळे दलित मतांचे विभाजन झाल्यास ‘आप’ला फटका बसेल. २०२१ मध्ये झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारातून माघार घेतली होती. आताही काँग्रेसने या निवडणुकीत फारसे स्वारस्य दाखवलेले नाही. त्यामुळे ममता बनर्जींप्रमाणे केजरीवाल यांनाही भाजपचे आक्रमण यशस्वीपणे परतावून लावण्यात हातभार लागू शकतो.