Premium|Study Room : भारताच्या अंतर्गत सुरक्षेपुढील सायबर युद्धाचे नवे रणांगण!

Impact of Artificial Intelligence on India's national security strategy : भारताच्या डिजिटल सीमांना सायबर हल्ल्यांचे वाढते ग्रहण; ५० हजार दैनंदिन हल्ल्यांचे प्रयत्न आणि एआय-आधारित डीपफेक आव्हानांचा सामना करण्यासाठी 'सायबर कमांड' व डीपीडीपी कायद्याद्वारे उभारलेले देशाचे अभेद्य सुरक्षा कवच यावर आधारित विशेष लेख.
Impact of Artificial Intelligence on India's national security strategy

Impact of Artificial Intelligence on India's national security strategy

esakal

Updated on

लेखक : गौरव कुमार बाळे

बदललेले युद्धाचे स्वरूप

विसाव्या शतकातील युद्धे ही प्रामुख्याने भौगोलिक सीमांवर भूदल, नौदल आणि वायुदलाद्वारे लढली जात होती. मात्र, एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या अफाट विस्तारामुळे 'सायबर स्पेस' हे पाचवे युद्धक्षेत्र (Fifth Domain of Warfare) म्हणून उदयास आले आहे. आज भारतासारख्या वेगाने डिजिटल होणाऱ्या देशासाठी 'डेटा' हे केवळ आर्थिक इंधन नसून ते राष्ट्रीय सुरक्षेचे केंद्रस्थान बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सिक्युरिटी हे दोन घटक आता भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या रणनीतीमध्ये अविभाज्य बनले आहेत. 'इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' (MeitY) ताज्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सायबर हल्ल्यांच्या प्रमाणात सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होत आहे. हे हल्ले केवळ तांत्रिक बिघाड नसून भारताच्या प्रगतीला खीळ घालण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कृत्रिम बुद्धिमत्तेची आव्हाने

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सायबर सिक्युरिटीसमोरील आव्हाने आता अधिक जटिल आणि 'अदृश्य' झाली आहेत. 'मॅकेफी' (McAfee) च्या अहवालानुसार, भारतातील ६९% नागरिकांना 'डीपफेक' द्वारे तयार केलेले खोटे ऑडिओ आणि व्हिडिओ ओळखणे कठीण जाते, ज्याचा फायदा घेऊन देशविरोधी शक्ती समाजात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करत आहेत. याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रगत 'मालवेअर' स्वतःचे कोडिंग बदलण्याची क्षमता ठेवतात, ज्यामुळे पारंपारिक सुरक्षा कवच त्यांना शोधण्यात अपयशी ठरते. २०२३-२४ मध्ये भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर दररोज ५०,००० हून अधिक अयशस्वी सायबर हल्ल्यांचे प्रयत्न नोंदवले गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बँकिंग, ऊर्जा क्षेत्र आणि संरक्षण संस्थांना लक्ष्य करून देशाची आर्थिक आणि सामरिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com