
बांगलादेशातून होणारं प्रचंड बेकायदा स्थलांतर, त्यातून लोकसंख्येवर येणारा दबाव त्यातून आसामी संस्कृतीवर होणारा परिणाम त्याचबरोबर सतत येणारे पूर, वन्यप्राण्यांची हत्या आदी, सोने आणि अमली पदार्थांची तस्करी आदी समस्या आसाम सरकारपुढे आ वासून उभ्या आहेत.
त्यामुळेच त्यावर उपाय शोधण्यासाठी आसाम सरकारने उपग्रहांचा आधार घ्यायचं ठरवलं आहे. बेकायदेशीर स्थलांतरीत, अमली पदार्थांची तस्करी आणि वन्यजीव निरीक्षणासाठी आसाम सरकार ५ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.