Premium|Cyber Crime: सायबर गुन्हेगारांना थांबवण्यासाठी 'डेझी' आजीचा अनोखा सापळा

ATM Scams: त्याला वाटतं की हा नंबर ‘डेझी’ नावाच्या एका प्रेमळ आजीचा आहे. पलीकडून थरथरत्या आवाजात उत्तर येतं, ‘‘गुड मॉर्निंग बाळा...
ATM SCAM

ATM SCAM

Esakal

Updated on

ब्रिजेश सिंह

brijeshbsingh@gmail.com

आमच्याकडे लॅण्डलाईन असो किंवा मोबाईल, या महिन्यात एकदा तरी तुम्हाला नक्कीच असा फोन आला असेल, ज्यात पलीकडची व्यक्ती तुम्हाला सांगते की, ‘‘तुमचं एटीएम कार्ड आज ब्लॉक होणार आहे’’ आणि ते टाळण्यासाठी तुम्हाला आलेला ‘वन-टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सांगावा लागेल. अशावेळी प्रत्येक सुजाण नागरिक फोन कट करतो; पण अनेकदा आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा घाबरतात आणि समोरच्या व्यक्तीच्या सूचनांचे पालन करतात. काही मिनिटांतच खात्यातून पैसे गायब होतात, तो नंबर पुन्हा कधीच लागत नाही आणि दिवस मनस्तापात जातो.

आता कल्पना करा की तोच फसवा माणूस एका ब्रिटिश नंबरवर फोन लावतो. त्याला वाटतं की हा नंबर ‘डेझी’ नावाच्या एका प्रेमळ आजीचा आहे. पलीकडून थरथरत्या आवाजात उत्तर येतं, ‘‘गुड मॉर्निंग बाळा... अगदी आत्ताच चहाचं आधण ठेवत होते. तू साखर घेतोस का?’’ पुढची सत्तावीस मिनिटं तो कॉलर फोनवरच असतो. तो त्याच्या बनावट बँकेच्या वेबसाईटचं स्पेलिंग पुन:पुन्हा सांगत असतो आणि डेझी आजी आपला चष्मा शोधत असते, जो तिच्या मते १९९८ पासून हरवला आहे. पार्श्वभूमीवर कुठेतरी कुत्रा भुंकतोय, नातवंडांचा किलबिलाट ऐकू येतोय आणि रेडिओवर त्या काळातलं गाणं वाजतंय, जेव्हा भारतात नुकताच रंगीत टीव्ही आला होता. घोटाळेबाजाला जेव्हा कळतं की आपली फिरकी घेतली जात आहे, तोपर्यंत त्याच्या कॉल सेंटरमधील इतर तीन साथीदारांनीही डेझी आजीच्या दुसऱ्या महायुद्धातील रेशनच्या आठवणी ऐकण्यात आपली मौल्यवान मिनिटं वाया घालवलेली असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com