risks of audit exemption under Companies Act Section 139
esakal
डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकौंटंट
financial discipline vs ease of doing business India: कें द्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय कंपनी कायद्यातील कलम १३९ मध्ये सुधारणा करून, वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयापर्यंत असलेल्या कंपन्यांना सक्तीच्या वैधानिक (स्टॅच्युटरी) ऑडिटमधून सूट देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ वाढवणे, लहान उद्योजकांवरील अनुपालनाचा बोजा कमी करणे आणि खर्चात बचत घडवून आणणे, ही या प्रस्तावामागील प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. मात्र हा निर्णय केवळ तात्कालिक दिलाशापुरता मर्यादित न राहता, दूरगामी आर्थिक आणि संस्थात्मक परिणाम घडवू शकतो, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.