Premium | Aurora Borealis Canada : सौरवादळातून जन्मलेले ‘डान्सिंग नॉर्दर्न लाइट्स’; हिरवे, लाल, जांभळे अरोरा बोरीलीस अवकाशात झळकले

Northern Lights : सूर्यापासून निघालेले विद्युतभारीत कण पृथ्वीच्या वातावरणातील वायूच्या कणांशी आदळल्यामुळे अरोरा निर्माण होतो. निसर्गाच्या या अद्भुत प्रकाशनृत्याचा अनुभव लेखिकेने एल्क आयलँड पार्कच्या ऑस्टोटिन तलावाजवळ घेतला आहे
Northern Lights

Northern Lights

esakal

Updated on

डॉ. राधिका टिपरे

पूर्वेकडून सुरू झालेला आणखीन एक प्रखर प्रकाशझोत संपूर्ण आकाश व्यापून टाकत हिरव्या रंगाबरोबरच लाल, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या तेजोलहरींसमवेत वरून खाली येताना दिसला. जणू अवघे अंबर या रंगानं व्यापून टाकलं आहे, असं वाटत होतं. निमिषार्धातच या प्रकाशलहरी आकाशाच्या मध्यापर्यंत जाऊन गोल गोल गिरक्या घेऊ लागल्या असा भास होत होता.

कॅनडामधील एडमंटन शहरात मुलगा राहत असल्यामुळे या देशात नियमितपणे येणं होत असतं. पश्‍चिम कॅनडामधील हे शहर उत्तर ध्रुवीय सर्कलला खेटून असल्यामुळे जवळपास आठ महिने बर्फ आणि मरणाची थंडी असतेच, पण इथल्या उन्हाळ्यात मात्र आम्हाला सोसेल असं हवामान असतं. त्यामुळे त्याकाळात येणं आमच्यासाठी सोयीचं होतं. इकडे आल्यानंतर एक गोष्ट माहीत झाली होती, ती म्हणजे हिवाळा सुरू झाला, की इथल्या आकाशात अरोरा दिसतो. ‘नॉर्दर्न अरोरा’ म्हणजे अवकाशात दिसणारे रंगबेरंगी प्रकाशझोत! निसर्गात घडणारा एक चमत्कार, अत्यंत देखणा असा आविष्कार अशाप्रकारचं वर्णन केलं जाणारी ही घटना घडण्यापाठीमागे एक शास्त्रीय कारण आहे. पण निसर्गात घडणाऱ्या अनेक चमत्कारी घटनांपैकी एक असणारी ‘डान्सिंग नॉर्दर्न लाइट्स’ किंवा ‘अरोरा बोरीलीस’ हे एडमंटन शहरामधूनही दिसतं, हे कळल्यानंतरही मला काही हा अरोरा पाहायला मिळाला नव्हता. सहा-सात वर्षांपूर्वी एकदा ओझरतं पाहिलं होतं, पण समाधान झालं नव्हतं. त्यामुळे मागच्या भेटीत मी मनोमन ठरवलं होतं, ‘इट इज हायटाइम. काहीही झालं तरी यावेळी अरोरा पाहायचाच.’

त्या दिवशी शहराच्या भगभगत्या उजेडातही घरापाठीमागच्या अंगणातून अरोराचे प्रकाशझोत दिसताहेत हे कळल्यावर मात्र मुलाकडे हट्ट करून शहरापासून दूर, जिथे शहरी लाइटचा उजेड नसेल अशा एका नॅशनल पार्कमध्ये जाण्यासाठी आम्ही तातडीने निघालो. नंतर कळले की सूर्याच्या पृष्ठभागावर सौरवादळ आल्यामुळे त्याच दिवशी जगभरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी, सर्वत्र अतिशय सुंदर अरोरा दिसला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com