
आपण शिकतो. कामाला लागतो. पगार मिळतो. मग आपण अजून जोमाने काम करतो. अजून जास्त पगार मिळतो. मग पुढे अजून पगारवाढ होते. पण आपल्याला पहिल्या दिवसापासून जसे पैसे पुरत नव्हते तसेच आत्ताही पुरत नाहीत. असं का होतं? महागाई? बरोबर!
पण मग किरकोळ महागाई वाढीचे टक्के गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत या वर्षी सगळ्यात कमी आलेले आहेत. मग का बरं पुरत नाही पगार? म्हणजे, किरकोळ महागाईचे टक्के २.१ % इतके कमी आलेले असले तरीही आपल्या आयुष्याची गुणवत्ता बदललेली नाही. ती होती तशीच आहे.
आता तुम्ही म्हणाल की किरकोळ महागाई कमी असेल तर आपोआपच आपल्या आयुष्यात पैशांची गरज कमी झाली पाहिजे आणि मग आपण आनंदी राहू वगैरे-वगैरे. तर सध्या तरी तसं नाहीये, हो ना? याचं कारण असं की, Inflation म्हणजे महागाई फक्त एकाच प्रकारची नाहीये. Lifestyle inflation बद्दल तुम्हाला माहितीये का? काय आहे हे lifestyle inflation? त्यामुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडतो? आणि किरकोळ महागाई कमी होऊन सुद्धा आपलं आयुष्य तसंच चालू राहतं, ते का? हे सगळं समजून घेणार आहोत आजच्या या 'सकाळ प्लस'च्या विशेष लेखातून...