

Dynamic Bond Fund India
esakal
यनॅमिक बॉँड फंड गटात पाच वर्षे पूर्ण झालेले २३ फंड असून, विविध पर्यायांपैकी अॅक्सिस डायनॅमिक बॉँड फंडाने गेल्या पाच वर्षांत (१ डिसेंबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०२५) दरम्यान ५.७८ टक्के परतावा दिला आहे. या पाच वर्षांत व्याजदराचे एक आवर्तन पूर्ण झाले आहे. एक, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीत, फंडाने त्याच्या बेंचमार्क क्रिसिल कंपोझिट बाँड फंड इंडेक्सपेक्षा ०.९८ ते १.२० टक्के अधिक परतावा मिळविला आहे, तर सुरवातीपासून म्हणजे २७ एप्रिल २०११ ते १९ डिसेंबर २०२५ दरम्यान वार्षिक ७.८७ टक्के दराने परतावा दिला आहे. डायनॅमिक बाँड फंड गटात हा एक सशक्त पर्याय आहे. बॉँड फंडात पत (क्रेडिट प्रोफाइल) आणि गुंतवणूक केलेल्या रोख्यांची उर्वरित मुदत (ड्युरेशन) यांच्या वैविध्यातून गुंतवणुकीतील जोखीम आणि परतावा यांचे संतुलन साधता येते. अॅक्सिस डायनॅमिक बाँड फंड हा डायनॅमिक बाँड फंड गटात मालमत्ता क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेला फंड आहे. वेगवेगळ्या कालावधीत परताव्याच्या क्रमवारीत अॅक्सिस डायनॅमिक बाँड फंड चौथ्या ते सातव्या क्रमांकावर आहे. हा फंड गुंतवणुकीस कायम खुला (ओपन-एंडेड) डेट म्युच्युअल फंड आहे.