
Ayyappa Sangamam
esakal
जयदीप पाठकजी
धर्मसत्ता आणि राजसत्ता या देशात एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशातील काही राज्ये तर या दृष्टिकोनातून अधिकच संवेदनशील अशा स्वरूपाची. केरळ त्यापैकीच एक. शबरीमलातील ‘भगवान अय्यप्पा संगमम’वरून केरळमध्ये जोरदार राजकीय धुमशान सुरू आहे. शबरीमलातील भगवान अय्यप्पा राजकीय आणि धार्मिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. या धर्मसत्तेच्या अन् राजसत्तेच्या वर्चस्ववादाबद्दल...
प्रतिष्ठित त्रावणकोर देवस्थानतर्फे केरळमध्ये ‘अयप्पा संगमम’ नावाच्या एका मोठ्या धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केरळ सरकार आवश्यक ते सर्व प्रकारचे साह्य करील, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.
मंदिर देवस्थानाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल विजयन यांना अचानक उफाळून आलेल्या ‘जिव्हाळ्या’वर आणि विशेषतः त्याच्या ‘टायमिंग’वर भारतीय जनता पक्षाने तीव्र नाराजी नोंदवली आहे. त्यामुळे या महोत्सवाचे आयोजन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याच महिन्यात हा कार्यक्रम होत आहे. त्यावरून केरळच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक वेगळेच धुमशान पाहायला मिळत आहे. राजसत्ता ‘व्हाया’ धर्मसत्ता, असेच त्याचे काहीसे स्वरूप आहे.