Premium|Bacchu Kadu Achalpur development model : शेतकऱ्याला जोडधंद्याचा आधार देत लोकसहभागातून उभं राहिलेलं बच्चू कडूंचं अचलपूर विकास मॉडेल

Agricultural allied businesses and rural empowerment : आईच्या कष्टातील चिल्लर पैशांपासून ते अचलपूरच्या विकासापर्यंतचा बच्चू कडू यांचा थक्क करणारा प्रवास; शेतीला जोडधंद्याची जोड देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणारा आणि संघर्षातून शाश्वत विकासाकडे जाणारा प्रहारचा एक यशस्वी प्रयोग.
Agricultural allied businesses and rural empowerment

Agricultural allied businesses and rural empowerment

esakal

Updated on

बच्चू कडू

मला आंदोलन करायचं असेल किंवा कुणाची मदत करायची असेल; तर मी आईकडे पाहायचो. ती तिच्या कष्टातून पैसे द्यायची. अनेकदा चिल्लर घेऊन मी पेट्रोल भरलेलं आजही आठवतं. त्या अनुभवांनी मला खूप काही शिकवलं. शेतकऱ्याला फक्त शेती पुरेशी नसते, जोडधंदा हा त्याचा खरा आधार असतो.

मीलहान होतो, तेव्हापासून माझ्या घरातील परिस्थिती, कष्ट आणि जगण्याची धडपड अगदी जवळून पाहत आलो आहे. आम्ही शेतकरी कुटुंबात जन्मलो; पण आमचं आयुष्य केवळ शेतीवर आधारलेलं नव्हतं. आमच्या घराला खरी उभारी दिली, ती माझ्या आईने उभारलेल्या दूध-दुभत्याच्या व्यवसायाने. माझी आई किती शिकलेली होती, हे मला ठाऊक नाही; पण सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण तिच्याकडे विलक्षण होती. तिने मला लहानपणापासूनच विचार दिला. तिने मला गाडगेबाबा वाचायला लावले, छत्रपती शिवाजी महाराज वाचायला लावले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सामान्य माणूस स्वाभिमानाने कसा जगतो, हे तिच्या आयुष्यातून दाखवून दिलं.

घरात गाई-म्हशी होत्या. पहाटेपासून दिवस सुरू व्हायचा. दूध काढणं, ते विकणं आणि त्या पैशातून घर चालवणं ही आमची जीवनशैली होती. आज मी ठामपणे सांगतो, की आमच्या घरातील प्रत्येक यशामागे या जोडधंद्याचा मोठा वाटा आहे. आमचं शिक्षण, आमचे लाड, आमचं बालपण हे सगळं दूध-दुभत्यावर उभं राहिलं.

मला कुठे जायचं असेल, आंदोलन करायचं असेल किंवा कुणाची मदत करायची असेल; तर मी आईकडे पाहायचो. ती तिच्या कष्टातून पैसे द्यायची. अनेक वेळा चिल्लर पैसे घेऊन मी पेट्रोल भरलेलं आजही आठवतं. त्या अनुभवांनी मला शिकवलं. शेतकऱ्याला फक्त शेती पुरेशी नसते, जोडधंदा हा त्याचा खरा आधार असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com