

Sholay 50 years
esakal
मला सांगावंसं वाटतं, की खरं तर मला त्याबाबत कल्पना होती. मात्र, असं थेट म्हणणं चुकीचं ठरेल. ‘शोले’ बनवताना असा काही विचार डोक्यात आला नाही. मात्र, मी चांगला सिनेमा तयार करेन एवढंच डोक्यात फिट्ट होतं. मात्र, ‘शोले’ एवढा लोकप्रिय होईल, एवढा चालेल की प्रेक्षक ५० वर्षांनंतरही त्याबद्दल चर्चा करत राहतील आणि रसिक तो अजूनही पाहतील, असा विचार कधीच केला नव्हता.
माझं आणि ‘शोले’चं नातं अगदी हृदयाजवळचं आहे. मी त्याच्यापासून स्वतःला वेगळं करू शकत नाही. हा सिनेमा मी खूप प्रेमाने, जीव ओतून बनवला. ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी ‘शोले’ला प्रेम दिलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आज ५० वर्षांनंतर आपण या चित्रपटाबद्दल बोलतोय, हे खूप छान वाटतं. मात्र, त्यावेळी याची पुसटशीही कल्पना नव्हती.
आम्ही गब्बरच्या भूमिकेसाठी डॅनी डेंजोप्पा यांना साईन केलं होतं; पण ते फिरोज खान यांच्या ‘धर्मात्मा’साठी अफगाणिस्तानमध्ये चित्रीकरण करत होते. त्यामुळे तारखा जुळत नव्हत्या. मग दोन पर्याय होते, त्यांची वाट पाहणं किंवा नवीन चेहरा घेणं... बाकी सर्व कलाकारांच्या तारखा आम्ही घेतल्या होत्या, त्यामुळे थांबणं शक्य नव्हतं.