Premium|Nepal new PM Balendra Shah : प्रस्थापितांच्या पलीकडचे नेतृत्व

Nepal Political Transformation 2026 : नेपाळमध्ये प्रस्थापित राजकारणाला नाकारत तरुणाईने बालेन शाह यांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवली आहेत. भ्रष्टाचार आणि अस्थिरतेच्या गर्तेतून देशाला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आता या तरुण 'रॅपर' पंतप्रधानासमोर आहे.
Nepal new PM Balendra Shah

Nepal new PM Balendra Shah

esakal

Updated on

वाढता भ्रष्टाचार, सत्ताकारणात तगून राहण्यासाठीच्या वारेमाप तडजोडी आणि गतिशून्य अर्थव्यवस्था या सर्वांना कंटाळून नव्या कोऱ्या, राष्ट्रीय राजकारणात नवख्या असलेल्या नेत्यामागे नेपाळी तरुणाई ठाम उभी राहिली. त्यामुळेच आता खरी कसोटी आहे बालेन शाह यांची.

अलीकडे पाच मार्चला झालेल्या निवडणुकीच्या निकालांनंतर नेपाळच्या राजकारणाने आता कात टाकली आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. या निवडणुकीत जे घडले ते अभूतपूर्व होते. हिंदीत ज्याला ‘घिस्या-पिट्या’ म्हणतात, तशा प्रस्थापित राजकारणाला पूर्णपणे नाकारून, स्थापित चाकोरीला सपशेल वैतागलेल्या नव्या आकांक्षावान पिढीने नेपाळमध्ये एका नव्या नेतृत्वाच्या हाती आपले भवितव्य विलक्षण आशान्वितपणे सोपवले आहे. तरुण पंतप्रधान बालेंद्र ऊर्फ बालेन शाह या आकांक्षांना पुरे पडतात की पुन्हा एकदा कळत-नकळत मळलेल्या, सकृतदर्शनी सोप्या वाटेने जाण्याच्या मोहात अडकतात ते आता काळच सांगेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com