BCCI Incomeesakal
प्रीमियम आर्टिकल
BCCI Income: IPL मुळे खेळाडू श्रीमंत, बोर्डाची बंपर कमाई; पण क्रिकेटला काय मिळाले?
BCCI, Richest Cricketing Body, Global Cricket Revenue : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे आणि आयसीसीकडूनही महसूलातील सर्वाधिक वाटा BCCI ला मिळतो.. पण इतक्या पैशांचं नेमकं काय होतं? भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याचा कितपत फायदा होतो? क्रिकेटपटूंना काय मिळतं?
क्रिकेट हा भारतीयांच्या भावनांशी जोडला गेलेला खेळ आहे. इथे भारतीय संघाच्या विजयाचा जोरदार जल्लोष केला जातो, पराभवाच्या वेदना मनाला टोचतात, मोठ्या स्पर्धेतील अपयशानंतर इथे खेळाडूंच्या घरांवर हल्लेही झालेले आहेत, स्टेडियमवर जाळपोळही झालीय... इतका हा खेळ भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण, भावनांपलिकडे या खेळाने मोठी आर्थिक झेप घेतली आहे. आयपीएलच्या धर्तीवर जगभरात क्रिकेट लीगचे आयोजन केलं जातंय.. यातलीच एक लीग म्हणजे इंग्लंडमधील दी हंड्रेड लीग... सध्या या लीगची युरोपमध्ये चर्चा सुरू आहे, परंतु त्यांना आयपीएल फ्रँचायझीकडून मदतीची गरज भासली आहे. यानिमित्त क्रिकेटमधील अर्थकारण, खेळाडूंवरील पैशांचा पाऊस आणि क्रिकेट बोर्डाची कमाई याचा घेतलेला आढावा....