
प्रियाला बोनस मिळाला. ती फारच खुश झाली. पण तिला त्याक्षणी एकदम टेंशन सुद्धा आलं. पैसे गुंतवले नाहीत तर खर्च होतील की काय असं तिला वाटत होतं. “पैसे कसे गुंतवू? एकदमच गुंतवावे की हळू हळू? “ असे प्रश्न तिला पडायला लागले.
आणि हा प्रश्न अनेक नवीन गुंतवणूकदारांना पडतो. तुमच्या मनातही हाच विचार असेल, तर चला याचं उत्तर मिळवूयात! आज आपण गुंतवणुकीच्या दोन मुख्य पद्धती समजून घेणार आहोत, SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि Lumpsum म्हणजे एकदाच मोठी गुंतवणूक. तुमच्या गरजा आणि तुमच्याकडे असलेल्या पैशांनुसार कोणती पद्धत तुमच्यासाठी चांगली आहे? हे आपण 'सकाळ प्लस'च्या या लेखातून समजून घेऊयात...