
निकिता कातकाडे
पुण्याच्या तुळशीबागेत पारंपरिक महाराष्ट्रीय दागिन्यांपासून ट्रेंडी, वेस्टर्न स्टाइलच्या ज्वेलरीपर्यंत सगळं काही मिळतं. इथं मिळणारी ठुशी, नथ, बाजूबंद, मोत्यांच्या साखळ्या आणि कुड्या विशेष लोकप्रिय आहेत. साध्या पण मोहक अशा मोत्यांच्या माळा आजही नववधूंपासून ते ज्येष्ठ स्त्रियांपर्यंत सर्वांनाच भावतात. याशिवाय, लग्नसराईसाठी खास पारंपरिक सेट्सही इथं सहज मिळतात. इथली मीनाकारी, बोहेमियन स्टाइल आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीही खूप लोकप्रिय आहे. काळसर-सिल्व्हरी झाक असलेले मोठे झुमके, हेवी नेकपीस, बांगड्या आणि अंगठ्या या सर्व गोष्टी इथे अगदी कमी किमतीत उपलब्ध आहेत.