पुणे: PCOD किंवा PCOS असे शब्द आता भारतीय महिलांसाठी तितकेसे नवे राहिले नाहीत. कारण भारतातही हजारो महिला या समस्येशी सध्या लढा देत आहेत. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही महिलांमध्ये आढळणारी आणि हार्मोनशी संबंधित समस्या. या समस्येमुळे महिलांना मासिक पाळी अनियमित येणे, पाळीत अडचणी येणे, चेहऱ्यावरील केस वाढणे, पुरळ येणे, वजन वाढणे आणि मूल न होण्याच्या समस्या निर्माण होतात. पण या अडचणी कमी म्हणून की काय.. आयआयटी बॉम्बेच्या संशोधनातून या समस्येत आणखीन भर घालणारी माहिती समोर आली आहे. यामुळे महिलांच्या करियर आणि एकुणातच प्रोफेशनल ग्रोथवर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमके हे संशोधन काय आहे आणि कसे केले गेले? PCOS ची समस्या म्हणजे काय? जगभरात ही समस्या असणाऱ्या महिलांचे प्रमाण किती? आयआयटी बॉम्बेच्या संशोधनात याविषयी काय म्हंटले आहे? या सगळ्या गोष्टींचा महिलांच्या एकुणातच करियर आणि प्रोफेशनल आयुष्यावर परिणाम होऊ शकतो का..? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या विशेष लेखातून..