

Bigg Boss and Mental Health: Can Reality Shows Cause Depression?
E sakal
Reality TV and Mental Health: The Psychological Impact of Bigg Boss
टीव्हीवरचे रिअॅलिटी शो म्हटल्यावर टीआरपीसाठी वाद विवाद, स्पर्धकांतील भांडणं, कुरघोड्या हेच डोळ्यासमोर येतं. कधी स्पर्धकांच्या करिअरबद्दल, कधी त्यांच्या वागण्याबोलण्याबद्दल तर कधी त्यांच्या पूर्वायुष्यातील कटू प्रसंगांना एक झणझणीत फोडणी देऊन बहुतांश शो चालत असतात. वरवर पाहता एखादा खेळ भासणारी ही गोष्ट सामान्य मात्र नक्कीच नाही. हे रिअॅलिटी शो टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असतात खरे पण या वाद-भांडण आणि राड्याच्या पलीकडे एक प्रश्न अनुत्तरित राहतो - सततची भांडणं, निद्रानाश आणि एकटेपणाचा खेळ स्पर्धकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर नेमका कोणता ओरखडा उमटवतोय? हे फक्त मनोरंजन आहे की मानसिक आरोग्याचा सायलेंट किलर?