

Bihar caste politics analysis
esakal
सुरेंद्र पाटसकर
बिहार विधानसभेची आगामी निवडणूक ही मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनाही आपले नेतृत्व सिद्ध करण्याची ही संधी असणार आहे. प्रशांत किशोर यांच्या रूपाने राज्यातील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांपुढे एक नवे आव्हान निर्माण झाले आहे. असे असले तरी जातीपातीच्या राजकारणावरच यापूर्वीच्या निवडणुका लढविल्या गेल्या आहेत, हे वास्तव आहे. याही वेळी तेच होण्याची शक्यता आहे.
बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी साधारणत: सहा तास आधी सहा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता सत्ताधारी नितीशकुमार यांच्या सरकारने २१ लाख महिलांच्या बँकखात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले होते. त्यामुळे महिला रोजगार योजनेतील लाभार्थींची संख्या एक कोटी २१ लाखांवर पोहोचली.
esakal