
संजय कुमार
बिहारमध्ये तीन महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी, महाविकास आघाडी आणि जनसुराज्य पक्ष अशी तिरंगी लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाविषयी विरोधकांकडून प्रश्न उपस्थित होत असून, बेरोजगारी, स्थलांतर यांसारखे मुद्दे सर्वच पक्षांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संयुक्त जनता दलाच्या प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय लोक जनता दलाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी काही दिवसांपूर्वी केले.