
freebies in Bihar election 2025
esakal
सुनील चावके
बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी सत्ताधारी आघाडीसमोर आव्हान उभे केले आहे. त्यातच प्रशांत किशोर यांनी लालूप्रसाद-तेजस्वी यादव यांच्याविषयी घेतलेली सौम्य भूमिका, इंडिया आघाडीसोबत मागच्या दाराने ताळमेळ साधण्याचे प्रयत्न भाजप-जदयुला पुन्हा सत्तेत येण्यात अडथळा बनू पाहात आहे. बिहारमध्ये विजय मिळविण्याचा निर्धार करूनच सत्ताधारी आघाडी काम करत आहे.
पं तप्रधानपदी असलेले नरेंद्र मोदी आणि नऊ महिन्यांचा अपवाद वगळता २० वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार यांच्यासाठी वेगवेगळ्या कारणांमुळे यंदाची बिहारची विधानसभा निवडणूक अग्निपरीक्षा ठरणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या सौजन्याने बिहारच्या मतदारयाद्यांचे शुद्धीकरण होत असतानाच या अग्निपरीक्षेत तावून सुलाखून निघण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून बिहारमध्ये मोदी-नितीशकुमार यांनी गेल्या दोन महिन्यांपासून रेवड्यांच्या मुसळधार वर्षावात कोट्यवधी मतदारांना चिंब भिजवून टाकले आहे.