

Bihar Assembly Elections
सुनील चावके
बिहार विधानसभा निवडणूक रंगतदार अवस्थेला पोहोचली असून, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडी यांच्यामध्ये चुरस आहे. या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद निश्चितपणे राष्ट्रीय राजकारणात पडणार आहेत. हा निकाल काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील विश्वासार्हतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. तर, या निकालानंतर भाजपकडून विरोधी खासदार फोडण्याचे प्रयत्न होऊ शकतात, त्यामुळेही विरोधी आघाडीला सावध राहण्याची गरज आहे.
केंद्रात आणि विविध राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने निवडणुकांमध्ये झालेले पराभव पचविण्याची क्षमता गेल्या दशकभरात विकसित केली आहे. मात्र, विरोधी पक्षांमध्ये मात्र तेवढा कणखरपणा उरलेला नाही. यंदाची बिहारची निवडणूक सत्ताधारी भाजप किंवा विरोधी इंडिया आघाडीच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार नसली, तरी राष्ट्रीय राजकारणावर त्याचे पडसाद निश्चितपणे उमटणार आहेत.