

Bihar election
esakal
बिहारमधील निवडणुकीत जातीची संख्या त्यातही अतिमागास समूहातील अगदी छोट्या मतदार गटाचाही निकालात फरक पडू शकतो. त्यामुळे बिहारमधील सर्वच पक्षांनी आपापली मतपेढी सांभाळण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय. प्रशांत किशोर किती यश मिळवतात यावरही निवडणुकीनंतरची बरीच समीकरणे ठरणार आहेत.
बिहारच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जातींची समीकरणं राजकारणाच्या मध्यावर आली आहेत. बिहारला अनेकदा देशाच्या राजकारणातील प्रयोगाशाळा म्हटलं जातं, मात्र या राज्यात मागची किमान तीन-साडेतीन दशकं तरी जातगठ्ठ्यांच्या वाटणीतून सत्तेचं राजकारण साकारत आलं आहे. बिहारच्या या निवडणुकीतही जातीच्या गणितांचा प्रभाव अत्यंत स्पष्ट आहे. ‘एनडीए’ असो की ‘महागठबंधन’, जात गठ्ठे डोळ्यासमोर ठेवून दोघांनी उमेदवारी वाटप केल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. यात आपले पारंपरिक मतदार बिथरणार नाहीत, अशा बेतानं काही नवं घडवायचा प्रयत्नही जरूर आहे.